दिनांक : २३ मे २०१२
ऑफिस मधून निघालो. मी आणी मयुरी shopping ला जायचे म्हणून पुणे विद्यापीठ येथे भेटलो.
सेनापती बापट रोड वरून जाताना लक्षात आलं पेट्रोल पंपावर गर्दी जरा जास्तच आहे..
तिथून पुढे कर्वे रोड वर सुद्धा तेच दृश्य.
shopping जवळ जवळ ९ वाजता संपलं (वेळेआधीच)... बाणेर ला परत येताना बघतो तर काय.. प्रत्येक
पेट्रोल पंपावर जत्रा भरली होती.. आमचे पेट्रोल meter पण empty कडे झुकत होते.
मनात सारखी शंका..घरी नीट पोचाव रे देवा..अखेरीस बाणेर च्या पेट्रोल पंपावर गाडी घातली..वाटेत २-३ पेट्रोल pump बंद दिसले..
तेव्हाच मनात पाल चुकचुकली "किंमत वाढलेली अश्णार"
पण वाढून वाढून अशी किती वाढणारे ? २-४ रुपये... असा विचार मनात असतानाच एकाने सांगितले "तब्बल ७.५० रुपये दरवाढ झाली आहे.."
आधीच मकर राशीला बारमाही साडेसाती असते.. त्यात हे पेट्रोल ची ७.५० साती...
पेट्रोल पंपावर मात्र समस्त पुणेकरांनी वीकेंड ला तुळशी बागेत असते तशी गर्दी केली होती..
मनात विचार आला..गाडीची टाकी जास्तीत जास्त १० लिटर.. १० गुणिले ७.५० = ८० रुपये गेला बाजार...
आजही आपल्याला ८० रुपयाचा इतका मोल आहे? आम्ही मात्र गर्दी बघून घरचा रस्ता धरला...
पेट्रोल पंपावर बहुतेक IT वाले सुद्धा होते..
आपण जेव्हा एखाद्या multiplex मध्ये जातो तेव्हा ५ रुपयांच्या लाह्या (POP CORN ) ५० रुपयांना खातो...CCD मध्ये जातो तेव्हा ४० रुपये लिटर असलेल्या दुधाने बनवलेली कॉफ्फीच्या एका कपसाठी ७० रुपये मोजतो..तेव्हा हे मोल कुठे जातं???
मला तर मध्यम वर्गाची हीच गोची झाल्यासारखी वाटते... एकीकडे CCD , Multiplex, IPL च्या चक्रात आपण मौज ह्या व्याख्येखाली वाट्टेल तसा पैसा खर्च करतो...आणी एकीकडे ८० रुपये वाचवण्यासाठी रांगा लावतो?? रांगेत न उभा राहणारा मी, पेट्रोल सहज मिळाला असत तर टाकी फुल करून घेणारच होतो ना... माझ्यातला विरोधाभास मला बर्याचदा अस्वस्थ करतो...असो..(मी असो म्हंटलेले मयुरी ला आवडत नाही.. पण काही सवयी सुटत नाहीत..)
आता परत ऑफिस मध्ये, बस मध्ये पेट्रोल दरवाढीची चर्चा.. आपण कस परत सायकल ने ऑफिस ला यायला पाहिजे.. GO ग्रीन वगैरे वगैरे...
मी कॉलेज मध्ये असताना २०० रुपयात टाकी फुल व्ह्यची..आता बघा..असे डायलॉग आपण ऐकणार...
शेवटी काय पहिले पाढे पंचावन्न...
आज पेट्रोल पंप ओसाड पडलेले असतील...तेव्हा मी जयिन.. टाकी फुल करेन...२-३ दिवसात बातमी.."विरोधकांच्या आणी घटक पक्षांच्या दबावामुळे पेट्रोल दरवाढ मागे"
आणी २ दिवसाकता महाग झालेले पेट्रोल मी भरले ह्या विचाराने माझ्या मध्यमवर्गीय मनात अपार खिन्नता येईल...
खरच ८० रुपयाचं मोल आहे का? ह्या प्रश्नाचे उत्तर मला तरी सापडत नाही...

Very nice blog! :D
ReplyDeleteThanks a lot Chinmay..
ReplyDeleteExcellent!!!!
ReplyDeleteAso :)
Thanks KD :)
ReplyDeleteNot Bad :)
ReplyDelete@TOM : It feels so good that you are following this despite of being in marathi...
ReplyDeleteFeel free to share improvement areas :)
You are an ideal "consumer", Rohan! You are the fuel of economic engine. You will burn and increase the GDP growth of India. God (& finance minister of union government) bless you!
ReplyDeletesimple and smart! We can expect bigger blogs from you in future.:)
ReplyDeleteThanks Amruta for your comment..
DeleteHope to write more marahti in comming days :)