बरेच दिवस कुठे तरी फिरायला जायचं मनात होतं. अखेर ४ मे च्या वीकेंड ला दापोली ला जायचं पक्कं केलं.
मयुरी ला समुद्र खूप आवडतो त्यामुळे कोकणात कुठे तरी जायचं होतं. मागच्या वेळीस दिवे आगर ला जाऊन आलो होतो.
ह्या वेळीस दापोली हा पर्याय निवडला.
८-१० दिवस आधी पासूनच कुठे राहावयाच ह्याचा शोध चालू होता. इंटरनेट मुळे अनेक पर्याय मिळाले. त्यातूनच मग whisteling palm
रेसोर्ट नक्की केलं. शुक्रवारी सकाळी आम्ही ८:२० ला बाणेर पुणे येथून निघालो.
ऑफिस मधल्या मित्राच्या सल्ल्याने महाबळेश्वर च्या मार्गे जाण्याचा निर्णय घेतला !!!
वाटेत खेड शिवापूर ला नाश्ता करून पुढील प्रवासाला लागलो. मुंबई बेंगलोर महामार्ग असल्यामुळे रस्त्याचा काही प्रश्नच नव्हता..
महाबळेश्वर ला जाण्यासाठी वाई फाट्याला आम्ही उजवीकडे वळलो..खंबाटकी घाटातून हळू हळू पाचगणी ला पोचलो. हवेत झालेला बदल आम्हा दोघानाही सुखावून गेला..
संपूर्ण रस्त्याला दुतर्फा झाडी आणी गार हवा मन प्रसन्ना करत होती. महाबळेश्वर आलं. पर्यटक झुंडी ने दिसत होते. मे महिन्यात सुट्ट्या एन्जोय करायला आलेली मुले त्यांचे पालक, काही नवीन लग्न झालेले अशा सगळ्यानीच महाबळेश्वर फुलून गेले होते... आम्ही मात्र थांबण्याचा मोह आवरून आमच्या पुढील मार्गाला लागलो.
महाबळेश्वर हून पोलादपूर रस्त्याला लागलो. पूर्ण वळणा वळणा चा रस्ता होता.
मुंबई हुन महाबळेश्वर कडे येणाऱ्या बसेस ह्याच मार्गाने येत होत्या..
पोलादपूर ला आम्ही मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ला लागलो. तिकडून पुढे गेल्यावर खेड च्या अलीकडे कशेडी घाट लागला. मयुरी चं सुरु झाले "खूप वळणं वळणं आहेत"
पण पुणेकरांना समुद्र दर्शनासाठी इतके कष्ट घ्यावेच लागतात. असो. मधेच लागणारी झाडी ऐन उन्हाळ्यात ही गार हवा देत होती. वाहने हळू चालवा चे फलक सारखे दिसत होते.
वाटेत छोटी छोटी गावं जात होती. कोकण रेल्वे चे fly ओवर जात होते. मनात विचार येत होते.. विकासाच्या नावाखाली ज्यांनी जमिनी दिल्या त्या बिचार्या कोकणी लोकांच्या गावात स्टेशन आहे पण रेल्वे थांबतच नाही.. सगळच राजकारण... असो..
खेड भरणे येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडून उजवीकडे दापोली फाटा आहे तो पर्यंत गोवा महामार्ग होता. आता मात्र रस्ता जेमतेम २ गाड्या जातील असा झाला...
थोड्या वेळाने दापोली आले. तिकडे चौकशी करून कर्दे रस्त्याला लागलो. २:०० वाजले होते. पोटात कावळे एव्हाना ओरडायला लागले होते...
शोधत शोधत आम्ही पोहोचलो.
रेसोर्ट खूपच चं होतं. समोरचा अथांग समुद्र, स्वच्छ किनारा , आपुलकीची माणसं, टाप टीप रूम्स...अजून काय पाहिजे?
आधी सांगितल्यामुळे त्यांनी जेवण तयारच ठेवलं होतं...
सकाळी लवकर उठल्यामुळे आणि एकंदरीतच ५-६ तासाच्या प्रवासामुळे आम्ही खूप दमलो होतो.
दुपार असल्यामुळे beach वर जाण शक्यच नव्हतं. मग काय टीपिकल पुणेरी style दुपारची वाम्कुशी.. :) :)
५:०० वाजता उठलो.. समुद्र खुणावतच होता... २ तास पाण्यात मनसोक्त खेळलो. सूर्यास्त पहिला..
तिकडे लगेच चंद्रदर्शन पण झाले. सूर्य आणी चंद्राने एकमेकांना हाय बाय केलं जणू....
त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ होता.. त्यामुळे चंद्राचा ते रूप अजूनच मोहक भासत होतं...
लाटांचा तो आवाज कानात साठवून घेत होतो आम्ही...
इतका रेफ्र्शिंग होतं ते सगळं..आल्यावर मस्त गरम गरम पाण्याने अंघोळ केली.. फक्कड चहा घेतला.. आहा चहा पीत पीत समुद्र दर्शन..
आमची आनंदाची व्याख्या हीच...
रेसोर्ट खूपच अगत्यशील होतं.. तिकडे आम्ही पूल चेस कॅरम खेळलो....रात्री परत एकदा किनार्यावर फेर फटका मारला...
दुसर्या दिवशी सकाळी सकळी परत beach ... मयुरी ला सगळे स्पोर्ट्स करायचे होते..
आम्ही सुरुवात डोल्फिने सफारी ने केली... आम्ही पोचे पर्यंत २-३ बोटी निघून गेल्या होत्या..
मयुरी चं सुरु झाला " आता उशीर झाला.. तुझ्या झोपे मुळे.." मनात म्हंटला ( आम्ही मनातच म्हणयचे) " आग दिसेल तो डोल्फिने..अखेरीस आम्ही दोघा सगळ्यात पुढे.. आणी मागच्या बाजूला ३-४ family अशी आमची बोट निघाली...
त्यातली लहान मुळे रडत होती.. त्यांचे आई बाबा " नाही हा शोनू रडायचं" असा समजावत होते...
३-४ वेळा बोट दान दान आपटली..
मनात एकदम चर्र.. मारू देत तो डोल्फिने..जाऊ परत..पण मन घट्ट केलं.. काही झाला तरी आता माघार नाही... हेहेहे ....
पण खरच ती सफारी worth होती.. थोडा आत गेल्यावर आम्हाला १-२ डोल्फिने दिसायला लागले..हळूच शेपटी दिसायची.
खरी मजा आली जेव्हा अक्खा परिवार सोबत जाताना दिसला..३-४ डोल्फिने इक्त्र समुद्र सफारी ला निघाले होते..
डोळ्यात ते सगळं साठवून आम्ही परत किनार्याला लागलो..रूम वर येवून नाश्ता केला..
अंघोळी करून आम्ही निघालो आंजर्ले येथे... कर्दे ते आंजर्ले रस्ता खूप छान होता.. रात्यालागत हापूस च्या बागा..कैर्या लटकलेल्या..
एका ठिकाणी थांबून आम्ही तोडणार तोच तिकडची राखणदार मंडळी आली धावून..
थोड्या अंतरावर मात्र आम्हाला मोकळे रान सापडलेच..आम्ही २-३ कैर्या तोडल्या मस्त..
आम्हाला बघून आजून एक chalisheeche काका काकू थांबले..
काकू काकांना जोर लावत होत्या.. ते सगळं होता होता तिकडे ती राखणदार मंडळी आली.
आम्ही धूम ठोकली.. बिचारे काका काकू...
कड्यावरचा गणपती मस्त आहे.. तिकडे आम्हला किंगफिशर पक्षाने दर्शन दिले..
नीला शार रंगाचा तो पक्षी खूपच मनमोहक होता..
लाम फांदीवर बसलेला तो तसा दृष्टीस नित दिसत नव्हता...
आमच्यासाठी तो तिकडून उडून मस्त एक हवेत गिरकी घेत विहिरीवर येवून बसला...
इतका छान वाटलं खरच... निसर्ग सुंदर आहे... तुमची दृष्टी हवी..
येताना पुण्य्च्या निम्म्या किमतीत मिळत असलेले हापूस आंबे घेतले...
जि बाई विकत होती ती सारखी " आम्ही नाही फसवणार. आंबे चांगलेच निघतील" असा सारखा सांगत होती. त्या पेट्या आता बाणेर च्या घरी आहेत. १ आठवड्यानंतर उघद्य्च्या आहेत..
तो पर्यंत प्रतीक्षा....
परतीचा रस्ता पण महाबळेश्वर मार्गेच होता....येताना आम्ही महाबल्श्वर च्या MTDC मध्ये जेवलो. MAPRO GARDEN ला थांबलो.. भयानक महाग आहे ते.. असो..
अखेरीस संध्याकाळी ७ ला अम्हे बाणेर ला परतलो ( अगदी ७ च्या आत घरात :) )
नयनरम्य दापोली तून सेमेंट च्या पुण्यात परत येताना लक्षात राहिलं.... अथांग समुद्र, पृथ्वी जवळ असणारा चंद्र, नीला शार किंगफिशर, गर्द झाडी, कोकणातली प्रेमळ माणसे..
आता आम्ही वाट बघतोय आंबे पिकायची..आणी परत कोकण दर्शनाची...

![]() |
| अथांग समुद्र... |
त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ होता.. त्यामुळे चंद्राचा ते रूप अजूनच मोहक भासत होतं...
लाटांचा तो आवाज कानात साठवून घेत होतो आम्ही...
इतका रेफ्र्शिंग होतं ते सगळं..आल्यावर मस्त गरम गरम पाण्याने अंघोळ केली.. फक्कड चहा घेतला.. आहा चहा पीत पीत समुद्र दर्शन..
आमची आनंदाची व्याख्या हीच...
रेसोर्ट खूपच अगत्यशील होतं.. तिकडे आम्ही पूल चेस कॅरम खेळलो....रात्री परत एकदा किनार्यावर फेर फटका मारला...
दुसर्या दिवशी सकाळी सकळी परत beach ... मयुरी ला सगळे स्पोर्ट्स करायचे होते..
आम्ही सुरुवात डोल्फिने सफारी ने केली... आम्ही पोचे पर्यंत २-३ बोटी निघून गेल्या होत्या..
मयुरी चं सुरु झाला " आता उशीर झाला.. तुझ्या झोपे मुळे.." मनात म्हंटला ( आम्ही मनातच म्हणयचे) " आग दिसेल तो डोल्फिने..अखेरीस आम्ही दोघा सगळ्यात पुढे.. आणी मागच्या बाजूला ३-४ family अशी आमची बोट निघाली...
त्यातली लहान मुळे रडत होती.. त्यांचे आई बाबा " नाही हा शोनू रडायचं" असा समजावत होते...
३-४ वेळा बोट दान दान आपटली..
मनात एकदम चर्र.. मारू देत तो डोल्फिने..जाऊ परत..पण मन घट्ट केलं.. काही झाला तरी आता माघार नाही... हेहेहे ....
पण खरच ती सफारी worth होती.. थोडा आत गेल्यावर आम्हाला १-२ डोल्फिने दिसायला लागले..हळूच शेपटी दिसायची.
खरी मजा आली जेव्हा अक्खा परिवार सोबत जाताना दिसला..३-४ डोल्फिने इक्त्र समुद्र सफारी ला निघाले होते..
डोळ्यात ते सगळं साठवून आम्ही परत किनार्याला लागलो..रूम वर येवून नाश्ता केला..
अंघोळी करून आम्ही निघालो आंजर्ले येथे... कर्दे ते आंजर्ले रस्ता खूप छान होता.. रात्यालागत हापूस च्या बागा..कैर्या लटकलेल्या..
एका ठिकाणी थांबून आम्ही तोडणार तोच तिकडची राखणदार मंडळी आली धावून..
थोड्या अंतरावर मात्र आम्हाला मोकळे रान सापडलेच..आम्ही २-३ कैर्या तोडल्या मस्त..आम्हाला बघून आजून एक chalisheeche काका काकू थांबले..
काकू काकांना जोर लावत होत्या.. ते सगळं होता होता तिकडे ती राखणदार मंडळी आली.
आम्ही धूम ठोकली.. बिचारे काका काकू...
कड्यावरचा गणपती मस्त आहे.. तिकडे आम्हला किंगफिशर पक्षाने दर्शन दिले..
नीला शार रंगाचा तो पक्षी खूपच मनमोहक होता..
लाम फांदीवर बसलेला तो तसा दृष्टीस नित दिसत नव्हता...
आमच्यासाठी तो तिकडून उडून मस्त एक हवेत गिरकी घेत विहिरीवर येवून बसला...
इतका छान वाटलं खरच... निसर्ग सुंदर आहे... तुमची दृष्टी हवी..
येताना पुण्य्च्या निम्म्या किमतीत मिळत असलेले हापूस आंबे घेतले...
जि बाई विकत होती ती सारखी " आम्ही नाही फसवणार. आंबे चांगलेच निघतील" असा सारखा सांगत होती. त्या पेट्या आता बाणेर च्या घरी आहेत. १ आठवड्यानंतर उघद्य्च्या आहेत..
तो पर्यंत प्रतीक्षा....
परतीचा रस्ता पण महाबळेश्वर मार्गेच होता....येताना आम्ही महाबल्श्वर च्या MTDC मध्ये जेवलो. MAPRO GARDEN ला थांबलो.. भयानक महाग आहे ते.. असो..
अखेरीस संध्याकाळी ७ ला अम्हे बाणेर ला परतलो ( अगदी ७ च्या आत घरात :) )
नयनरम्य दापोली तून सेमेंट च्या पुण्यात परत येताना लक्षात राहिलं.... अथांग समुद्र, पृथ्वी जवळ असणारा चंद्र, नीला शार किंगफिशर, गर्द झाडी, कोकणातली प्रेमळ माणसे..
आता आम्ही वाट बघतोय आंबे पिकायची..आणी परत कोकण दर्शनाची...

Very nice blog!
ReplyDeleteIts been some time I read such a good Marathi blog. And I specially liked Kingfisher snap. :D
Have fun!